राहता शहरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या

राहाता : शहरात एका 20 वर्षीय तरुणाचा किरकोळ वादातून मुलाची सायकल उलटून फेकून मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काल रात्री साडेनऊच्या सुमारास राहाता शहरानजीक 15 व्या चारी शिवारात रोहित वर्मा या 20 वर्षीय तरुणाची दुचाकी शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील मुलाने पलटी केली.

या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संबंधित मुलाचा मोठा भाऊ अरबाज शेख याने साथीदारांच्या मदतीने रोहितला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

रोहित वर्मा जीव वाचवण्यासाठी बाजूच्या शेतात धावला असता आरोपी अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करून रोहितवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.

या हत्येचा थरार राहाता शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अरबाज शेख याला बेड्या ठोकल्या असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

Leave a Comment