क्लीव्हेज दाखवायची काय गरज होती, अभिनेत्रीचे वाढदिवसाचे फोटो पाहून चाहते भडकले
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तलला काही महिन्यांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिला कॅन्सर झाल्याचे लक्षात आल्यानंतरही ती खचली नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने तातडीने उपचार सुरू केले. छवी आता कॅन्सरमुक्त आहे. कॅन्सरच्या यशस्वी उपचारानंतर तिने नुकताच वाढदिवस साजरा केला.
छवीसाठी हा वाढदिवस खूप खास होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिचा बर्थडे सेलिब्रेशन झाला. छवीच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती मोहित हुसैन यांनी खास पार्टी दिली.
या पार्टीत त्यांचे अनेक सेलिब्रिटी मित्र आले होते. छवीने वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
मात्र काही लोकांना हे चित्र पाहून धक्काच बसला. छवीने वाढदिवसाच्या पार्टीला घातलेला ड्रेस काही लोकांना आवडला नाही. यावरून तिला ट्रोल करण्यात आले.
छवीने काही कमेंट्स शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वाढदिवसाला उघड पोशाख घालायची काय गरज होती? एकाने सांगितले की, चाहत्यांना खास संदेश देण्यासाठी असा ड्रेस घालण्याची गरज नाही.
दुसर्या यूजरने सांगितले की, तिने नैराश्यामुळे हे केले. मग तुमच्या पतीसोबत किसिंग फोटो शेअर करून तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न तिला अनेकांनी विचारला आहे.
ट्रोलर्सच्या प्रश्नांना उत्तर
छवीनेही या सगळ्यांना तिच्याच शब्दात उत्तर दिलं आहे. माझ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मी एक-दोन शब्द चाहत्यांशी शेअर केले आहेत. मला त्याची कधीच लाज वाटली नाही.
मी गेल्या 18 वर्षांपासून माझ्या पतीसोबत असे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यात नवीन काही नाही. आता तुम्ही ठरवाल की सेलिब्रिटीज काय शेअर करतात आणि काय नाही? आता राहुद्या… म्हणत छवीने ट्रोलर्सची शाळा घेतली आहे.