नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (के. चंद्रशेखर राव) राव यांच्या भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti-BSR) पक्षाने महाराष्ट्रात दणक्यात प्रवेश केला.
नांदेड येथे रविवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे चार माजी आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री राव यांनी शेतकरी योजना, महिला योजना अशा विविध विषयांवर भाष्य करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली.
चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या बैठकीत 4 माजी आमदारांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला. त्यात गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी आणि यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाण्याचे दिगंबर भिसे यांचा समावेश आहे.
तसेच संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यासह जाणे पसंत केले. के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथून भारत राष्ट्र समितीचा तेलंगणाबाहेर विस्तार करण्यास सुरुवात केली.
त्याला गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जाते. माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल झाले.
- Read More : राहता शहरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या
बीआरएस स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकाही लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांनी तेलंगणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
काही गावांनी महाराष्ट्रात सुविधा मिळत नसल्याचा दावा केला होता. याबाबत जुक्कल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हनुमंत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रातून तेलंगणात येण्याची गरज नाही.
तेलंगणातील सुविधा देण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहोत. त्याची सुरुवात आज नांदेड येथून झाल्याचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी सांगितले. तेलंगाना सारखाच विकास महाराष्ट्रात केला जाईल, त्मयासाठी तदारांनी साथ द्यावी असे ते म्हणाले.
उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी यांनी भाजपाच्या लाथाळीला व गटबाजीला कंटाळून नवे राजकीय समीकरण मांडणार असल्याचे सांगितले. आगामी काळात लातूर जिल्ह्यात मतदारांना सक्षम पर्याय देऊ असे, त्यांनी म्हटले आहे.