Sonali Phogat Death : सोनाली फोगट आणि पीए पती-पत्नी? गुरुग्राममधील एका फ्लॅटने पेच वाढवला

0
12
Sonali Phogat Death: Sonali Phogat and PA husband and wife? A flat in Gurugram added to the confusion

Sonali Phogat Death : गोव्यातील भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक गुपिते उघड होऊ लागली आहेत. तिच्या शरीरावर अनेक लहान-मोठ्या जखमा आढळल्या.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट आणि तिचा पीए दिसत आहे. काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत. दरम्यान, अजून एक नवा ट्विस्ट समोर आले आहे. सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर प्रकरण वाढू लागल्याने गोवा पोलिसांनी ड्रग थिअरी पुढे केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीरने सोनालीला मद्य व अंमली पदार्थ (MDMA) पिण्यास भाग पाडले होते. आता गुरुग्रामच्या फ्लॅट क्रमांक 901 ने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे.

Sonali Phogat Death News | ड्रग्ज दिल्यानंतर 2 तास सोनालीसोबत बाथरूममध्ये होते, त्या 120 मिनिटांत नेमकं काय घडलं?

सोनाली फोगटने गुरुग्राममध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तिने तो फ्लॅट सुधीरसोबत घेतला होता. हा फ्लॅट सेक्टर 102 मध्ये होता. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लॅट भाड्याने घेताना सुधीरने सोनाली ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले होते.

तिथे राहणाऱ्या लोकांनाही तो हेच सांगत होता. एवढेच नाही तर घर भाड्याने देताना पोलिस पडताळणीही करण्यात आली. गोव्याला जाण्यापूर्वी सोनाली या फ्लॅटवर राहण्यासाठी गेल्याचे समोर येत आहे.

सुधीर आणि सोनाली या फ्लॅटवर आले. काही वेळ थांबून आपली गाडी सोसायटीत उभी केली आणि टॅक्सी घेऊन विमानतळाकडे निघाले. पोलीस अधिक बोलण्यास नकार देत आहेत.

संशयित सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी भाजप नेते आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे. एवढेच नाही तर सोनालीची मालमत्ता हडप करून तिची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

दोघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले की, त्यांना कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाईल. सोनालीवर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

मात्र, प्रथमदर्शनी शवविच्छेदन अहवालात तसे काही दिसून येत नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करणार आहेत. दरम्यान, सोनाली फोगटच्या पार्थिवावर शुक्रवारी हिस्सारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा हिने तिच्या चुलत भावासह चिता पेटवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here