Pune Crime News | पुण्यातील विवाहितेला धबधब्याखाली आंघोळीस बसवणारा ‘भोंदूबाबा’ जेरबंद

Pune Crime News |  समाजात कितीही आधुनिकतेचे वारे वहात असले, डिजिटल इंडिया किंवा बेटी पढाओचे नारे दिले जात असले तरी रोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येतच आहेत. काही दिवसांपूर्वी मुलगा व्हावा आणि व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने अंध श्रद्धेच्या लागून एका  भोंदू बाबाकडे नेले होते.

त्या भोंदू बाबाने या व्यावसायिकाच्या पत्नीला पुणे शहरातील एका धबधब्याखाली अंघोळ करण्यास भाग पाडले. पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी व्यावसायिकाला असे घृणास्पद कृत्य करण्यास सांगणाऱ्या मौलाना बाबा जमादार (रा. झेंडा चौक इचलकरंजी कोल्हापूर) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली असून तातडीने भोंदू बाबापर्यंत पोहोचल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती, सासू आणि जादूगार भोंदू बाबा यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार फसवणूक मनुष्यवध आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sonali Phogat Case : सोनाली फोगट कर्ली क्लबमध्ये करत होती पार्टी, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितले

पीडित महिला आंबेगाव येथील रहिवासी असून 2013 मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती व सासूने तिचा छळ सुरू केला. व्यवसायात यश मिळावे आणि पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी या कुटुंबाने भोंदू मांत्रिकाच्या मागे धावायला सुरुवात केली होती.

अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानंतर पतीने महिलेला एका ठिकाणी नेऊन सर्वांसमोर धबधब्याखाली आंघोळ घातली. अत्यंत उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबातील हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या दृष्टीनेही तपासाला महत्त्व आले होते.

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपींच्या शोधासाठी कोल्हापुरात पथके रवाना केली, त्यानंतर इचलकरंजी परिसरात मांत्रिकाचा शोध घेण्यात आला आणि अखेर त्याला हातकड्या लावण्यात आल्या. त्याने अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का? याचाही आता पोलीस तपास करत आहेत.

Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *