पोस्ते पोदार लर्न स्कूलचा (सीबीएसई) दहावी परीक्षेत 100% निकालासह उत्तुंग भरारी

0
105
पोस्ते पोदार लर्न स्कूल

उदगीर : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली तर्फे इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षेत कै.काशिनाथ आप्पा पोस्ते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर द्वारा संचलित पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचा निकाल 100% लागला असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निकालाची उत्कृष्ट परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.

शाळेतील एकूण 103 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात 22 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत तसेच 45 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व 57 विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत विशेष बाब म्हणजे इंग्रजी शाळेत मराठी विषय अवघड जात असताना सुद्धा यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण घेतले आहेत.

पोस्ते पोदार लर्न स्कूल

तसेच गणित 100 पैकी100 एकूण 2 सामाजिक शास्त्र 100 पैकी 100 एकूण 1, संस्कृत मध्ये 100 पैकी 100 एकूण 3 जणांनी गुण घेतलेले आहेत. शाळेमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवत पटवारी विनायक विजय (97.2%)व रामकृष्ण मारुतीराव बिरादार (97.2%) हे दोन्ही विद्यार्थी समान समान गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत.

कु.अक्षता काळवणे (96.8%) या विद्यार्थिनी ने द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच चि.राठी गौरव ( 96.4%) तृतीय आला आहे . या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयाची मान उंचावली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कै. काशिनाथ पोस्ते बहुउद्देशीय संस्थेचे आदरणीय सचिव सुरज पोस्ते, संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका सुरज पोस्ते, प्राचार्य दिगंबर शेकापुरे, उप प्राचार्य डॉ.मुबारक मुल्ला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here