भीषण अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची आमदार संजय बनसोडे यांनी घेतली भेट

0
14

उदगीर : तालुक्यातील लोहारा गावाजवळ तुळजापूर येथील देवीचे दर्शन घेऊन उदगीरला परत येत असताना आज (दि.४) सकाळी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात उदगीर येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला.

या अपघातात दोन तरुण व तीन तरुणी घटनास्थळीच मयत झाले, तर एक तरुणी जखमी झाली असल्याची दुखद बातमी उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी सामान्य रुग्णालय उदगीर व पोलीस प्रशासनाला अपघात झालेल्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याची सूचना केली.

या अपघातात मयत झालेल्या पाच जणांना आमदार बनसोडे यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण असल्याचे सांगुन मयताचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांना देण्याच्या सुचना सामन्य रूग्णालयातील आरोग्य विभागाला दिल्या.

MLA Sanjay Bansode

या अपघातात प्रियंका बनसोडे ही तरुणी जखमी असून तिला तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयातून लातूर येथील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावे अशा सूचना केली.

जेव्हा हा अपघात झाला तेव्हा आमदार संजय बनसोडे हे बैंगलोर येथे खाजगी कामानिमित्त गेले होते. मात्र त्यांना आपल्या मतदार संघात हा गंभीर अपघात झाल्याचे वृत्त समजताच ते तातडीने बेंगलूरहुन थेट लातूरला आले.

शासकीय रूग्णालयात प्रत्यक्ष जखमी तरुणी प्रियंका बनसोडे हिची भेट घेतली. त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला आणि तत्काळ आर्थिक मदत पुढील उपचार करण्याची जबाबदारी घेतली आहे.

यावेळी डॉक्टरांशी चर्चा करून जखमी तरुणीवर योग्य औषध उपचार करावेत आणि जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या रुग्णाची काळजी घेण्याची सूचना केली.

यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्यासोबत रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हनुमंत किनीकर, प्रशांत पाटील होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here