उदगीर जिल्हा निर्मीतीच्या नावावर आमदार संजय बनसोडेंनी राजकारण करु नये : शिवानंद हैबतपूरे

0
105
शिवानंद हैबतपूरे

उदगीर: उदगीर जिल्हा निर्मिती हा प्रत्येक उदगीरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाच्या ऐरणीवरला हा विषय आहे. अगदी भाजपा शिवसेना युतीच्या काळात उदगीर परिसरातील देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर व जळकोट हे तालूके केवळ भाजपा च्या प्रयत्नाने झाले.

आजही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे उदगीर जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक असताना केवळ उदगीरकरांची दिशाभूल करण्यासाठी आमदार संजय बनसोडे हे या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी केला. 

आपल्या निवेदनात शिवानंद हैबतपूरे म्हणाले की गेल्या आठ वर्षापूर्वी उदगीर जिल्हा निर्मितीची बैठक झाली पण त्यानंतर त्यावर कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. गत आठ वर्षात शिवशाही, भाजपा-शिवसेना व महाराष्ट्र विकास आघाडी असे तीन सरकार येऊन गेले. या प्रदिर्घ काळात सर्वपक्षीय नेत्यांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. 

अगदी आमदार संजय बनसोडे मंत्री असताना त्यांनी उदगीर जिल्हा निर्मीतीसाठी काय प्रयत्न केले ?. जर खरंच आमदार संजय बनसोडेंना व राष्ट्रवादी काँग्रेसला उदगीर जिल्हा निर्मिती बद्दल थोडाफार जरी जिव्हाळा राहीला असता तर त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत हा विषय हाताळला असता. आज सत्ता गेल्यानंतर बनसोडेंना हा विषय आठवतो आहे.

सत्ता गेल्यानंतर आज आमदार संजय बनसोडेंच्या सभोवतालची गर्दी संपली आहे, अशा परिस्थितीत केवळ वैफल्यग्रस्त होऊन आमदार बनसोडे हा विषय हाताळत आहेत. वास्तविक पहाता उदगीर जिल्हा निर्मीती झाली पाहिजे या अत्यंत प्रमाणिक भावनेने काही मंडळींनी या संदर्भात बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीत सरकारशी कुठल्याही संवादाची व निवेदनाची प्रक्रिया न हाताळता थेट सरकार विरोधी आंदोलनाची जी रणनीती आखण्यात आली त्यातच आमदार बनसोडेंच्या राजकीय वैफल्याचे दर्शन घडते. एकिकडे भारतीय जनता पक्ष हा उदगीर जिल्हा निर्मितीसाठी अत्यंत सकारात्मक व कृतीशील असताना या विषयावर कोणी राजकारण करुन उदगीरकरांची दिशाभूल करत असतील तर भारतीय जनता पक्ष ही नौटंकी  चालू देणार नाही.

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनशील आणि विकसनशील आहे, असं असताना सरकारशी संवाद न साधता केवळ  आंदोलनाचा पवित्रा उचलून आपली राजकीय पोळी भाजण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा व समविचारी घटकांचा प्रयत्न हा राजकीय नौटंकीचा भाग आहे. अशा गोडबोलू व संधीसाधू राजकारणाची नौटंकी उदगीरकर ओळखून आहेत असे मत शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here