जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सध्या जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिया कपूरच्या वाढदिवसाला संपूर्ण कपूर कुटुंब जमले होते. या पार्टीत जान्हवी कपूरही सहभागी झाली होती.
मात्र, जान्हवी तिच्या मिस्ट्री मॅनसोबत पार्टीत दिसली. विशेष म्हणजे या पार्टीत मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरही पोहोचला होता. जान्हवी कपूर आणि तिचा मिस्ट्री मॅन एका पार्टीला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कॅमेरा समोर येताच जान्हवी कपूरने चेहरा लपवायला सुरुवात केली. जान्हवी कपूरच्या मिस्ट्री मॅनचे नाव ‘शिखर पहाडिया’ आहे. जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जान्हवी अनेकदा शिखर पहाडियासोबत दिसून आली आहे. मात्र, आता जान्हवीने शिखर पहाडियासोबत फॅमिली पार्टीतच शिखरचा समावेश केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांचेही खास नाते असल्याचे बोलले जाते.
काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरचा ‘मिल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, जान्हवीचा चित्रपट फ्लॉप झाला. मिली चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर देखील 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हे वर्ष स्टारकिड्ससाठी खास असणार आहे. कारण या वर्षात तब्बल सात स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
जान्हवीचा व्हायरल व्हिडिओ पाहता जान्हवी आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, जान्हवी किंवा शिखर दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.