उत्तर प्रदेश : गेल्या काही दिवसांपासून भटक्या प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे आणि आरपीएफची डोकेदुखी वाढल्याचे अधिकारी सांगतात. आतापर्यंत अनेक भटक्या जनावरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने यामागचे कारण शोधून काढले आहे. आरपीएफ पोलिसांनी रेल्वे रुळांवर सुरक्षा वाढवली आहे.
भटक्या जनावरांमुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होत असल्याची ओरड शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. नुकसानीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी एक कल्पना मांडली आहे. शेतकरी ओला चारा रेल्वे रुळांवर टाकत आहेत.

ओला चारा खाण्यासाठी येणाऱ्या जनावरांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अधिक सुरक्षा वाढवल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे.
उत्तर प्रदेश राज्यात गेल्या दोन महिन्यांत अपघातांमध्ये अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. बिलपूर, मीरानपूर कटरा, तिसुआ, विसरतगंज, रामगंगा, सीसीगंज परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. कारण गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. आरपीएफ पोलिसांनी हिरवा चारा फेकणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. तसेच हिरवा चारा फेकताना कोणी पकडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.