Crime News : मित्रासोबत ती लॉजवर आली, मित्रासोबत राहिली आणि त्यानंतर जे घडले ते धक्कादायक

सांगली : मित्राला भेटण्यासाठी ती लॉजवर आली होती. तिथेच राहण्याचा प्लॅन होता. एक मित्रही तिला भेटायला आला होता. दोघांमध्ये थोडा संवाद झाला. फ्रेश होण्यासाठी तो बाथरुममध्ये गेला आणि त्यादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुण बाहेर आला तेव्हा त्याच्या प्रेयसीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड करून सर्वांना लॉजवर बोलावले.

याबाबत त्यांनी पोलिसांना माहितीही दिली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रेयसीच्या मृत्यूचा तो एकमेव साक्षीदार असल्याने लॉजवरील तरुणाची सध्या चौकशी सुरू आहे.

नेमके काय घडले?

सांगली कोल्हापूर रस्त्यावरील साई डिलक्स लॉजमध्ये अस्मिता पाटील नावाची तरुणी आली. ती या लॉजवर सातत्याने यायची. 33 वर्षीय अस्मिता या व्यवसायाने सीए होत्या. या मित्राला भेटायला ती वरचेवर येत होती.

यावेळीही ती लॉजवर आली. तिने एका मित्राला फोन केला. तो भेटायला आला, त्यांच्यात बराच वेळ बोलणे झाले. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेले. त्यानंतर तो बाहेर आला असता अस्मिताने आपले जीवन संपवल्याचे त्याला आढळून आले.

या प्रकरणी नातेवाइकांनीही पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे अद्याप समोर आलेले नाही. अस्मिताचा शेवटपर्यंत एकच मित्र असल्याने तो मुख्य साक्षीदार असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या घटनेतील आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *