शिवाजीराव हुडे यांनी मारली बाजी, 319 मतदार वगळण्याचे आदेश, सभापती व सचिवावर काय कारवाई होणार?

0
44

उदगीर : कृषि उत्पन्न बाजार समिती सध्या अनेक प्रकारच्या वादात अडकली आहे. मागील काही महिन्यांपासून उदगीर येथील उद्योजक माजी सभापती शिवाजीराव हुडे विरुद्ध बाजार समितीचे सभापती असा सामना रंगला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जवळ येऊ लागली आणि राजकीय डावपेच रंगत आहेत. माजी सभापती शिवाजीराव हुडे यांनी सध्या या लढतीत एक अडथळा पूर्ण केला आहे.

सविस्तर माहिती अशी कि, शिवाजीराव हाणमंतराव हुडे यांनी दि. 21.11.2022 रोजीच्या अर्जान्वये व्यापारी मतदारसंघातील मतदार यादी संदर्भात अर्ज दाखल करुन हरकत घेतली आहे. दि.14.11.2022 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत शेतकरी मतदार संघात अ.क्र. 712 वर आहे.

त्या सोबतच व्यापारी मतदार संघाच्या यादीत अ.क्र. 180 वर देखील शिवाजीराव हाणमंतराव हुडे यांचे नाव आहे. शिवाजीराव हुडे यांनी म्हटले कि, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे त्यांची कसलीही सद्यस्थितीत अनुज्ञाप्ती नाही. सध्या बाजार समिती मध्ये एस.एच. हुडे या फर्मचे चालक व मालक स्वाती सचिन हुडे हे आहेत.

विशेष म्हणजे सन 2011 पासून बाजार समितीने वेळो वेळी एस.एच.हुडे या फर्मचे नुतनीकरण स्वाती सचिन हुडे यांच्या नावाने केलेले आहे. त्यामुळे शिवाजीराव हुडे यांच्या नावे कोणतीही अनुज्ञाप्ती नाही. तेव्हा व्यापारी मतदार संघाच्या यादीतील अ.क्र. 180 बेकायदेशीर रित्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे, यामागे कोणाचे हित व षड्यंत्र आहे, असा सवाल शिवाजीराव हुडे यांनी केला आहे.

शिवाजीराव हुडे म्हणाले कि, मी या पूर्वी अनेकदा बाजारसमिती मध्ये शेतकरी मतदार संघातून निवडून आलेलो आहे. सन 2012 ते सन 2016 पर्यंत मी कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती म्हणून देखील काम केलेले आहे.

त्यामुळे दि. 2/11/2022 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये माहिती घेतली असता मला असे समजले की. एस. एस. हुडे या फर्मचे नुतणीकरण झालेले आहे.

विद्यमान सचिव व तत्कालीन सभापती यांनी संगणमत करून जाणीवपूर्वक माझे नाव मतदार यादीत समाविष्ट केले आहे.

कारण शेतकरी मतदार संघातून निवडणूकीला थांबता येऊ नये म्हणून शिवाजीराव हुडे यांचे नाव व्यापारी मतदार संघाच्या मतदार यादीत बेकायदेशीर रित्या समाविष्ठ केलेले आहे.

तरी सदरील नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे अशी विनंती केली असता त्यावर महत्वपूर्ण निकाल लागला आहे.

शिवाजीराव हुडे यांनी आक्षेप अर्जासोबत पुराव्या दाखल प्रशासक, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर यांचा दिनांक 13.11.2022 रोजीचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेले आहेत. सदर आक्षेपाचे अनुषंगाने दि. 25.11.2022 रोजी या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.

सदरील सुनावणीस अर्जदार शिवाजीराव हाणमंतराव हुडे यांच्यावतीने ऍड. डी.एस.पांचाळ यांनी आपले म्हणणे मांडले की, मे.एस.एच. हुडे या फर्मचे मालक नाहीत, सदर फर्मच्या चालक व मालक स्वाती सचिन हुडे या आहेत. सदर फर्मचे लायसन्स स्वाती हुडे यांच्या नावे आहे.

स्वाती सचिन हुडे व शिवाजीराव हुडे हे विभक्त कुटूंबातील आहेत. त्या प्रमाणे वाटणी पत्र दि.15.03.2007 ला झालेले आहे. शिवाजीराव हुडे हे 1994 पर्यंत सदर फर्मचे मालक होते, त्या नंतर सन 1999 मध्ये तीन महिन्यासाठी मालक होते.

त्या नंतर शिवाजीराव हुडे यांचा सदर फर्मशी कोणताही संबंध राहिलेला नाही. शिवाजीराव हुडे यांनी 1999 नंतर मे. एस. एच. हुडे या फर्मचा परवाना नुतणीकरण करण्यासाठी कधीही अर्ज सादर केलेला नाही.

तसेच 2018 पासून पुढे आज तारखेपर्यंत सदर फर्मच्या नुतणीकरणाकरीता अर्ज सादर केलेला नाही. नुतणीकरण फीस भरलेली नाही.

शिवाजीराव हुडे यांना मुद्दाम व्यापारी दाखवण्यासाठी यादीत नाव घेतलेले आहे तरी ते वगळण्यात यावे, असे तोंडी म्हणणे मांडले.

सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर हे हजर होते. त्यांनी म्हणणे मांडले की, मे. एस. एच. हुडे या फर्म करीता सौ. स्वाती सचिन हुडे यांना लायसन्स देण्यात आलेले होते. सौ. स्वाती हुडे यांचे लायसन्स 2018 पर्यंत होते.

त्यानंतर बाजार समितीने ठराव केल्यामुळे शिवाजीराव हुडे यांची प्रोप्रायटर म्हणून दप्तरी नोंद केली सन 2018-19 मध्ये लायसन्स मिळणे बाबतचा शिवाजीराव हुडे यांचा अर्ज बाजार समितीच्या दप्तरी उपलब्ध नाही. शिवाजीराव हुडे यांनी स्वतः फीस भरून नुतणीकरण केलेले आहे, असे म्हणणे सचिव यांनी मांडले.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. उदगीर हे सुनावणीस हजर होते. आक्षेपकर्ते शिवाजीराव हाणमंतराव हुडे यांनी अर्हता दिनांकापूर्वी दोन वर्ष अगोदर सन 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षात अनुज्ञाप्ती करीता अर्ज केलेला दिसून येत नाही.

त्यांना अनुज्ञाप्ती मंजूर केलेली दिसून येत नसल्याचे बाजार समितीच्या नोंदीवरून दिसून येते. त्या मुळे आक्षेपकर्ते यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ठ करणे योग्य वाटत नाही, असा अभिप्राय त्यांनी दिला.

आक्षेप अर्जासोबत आक्षेपकत्याने पुराव्यादाखल प्रशासक, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर यांचा दिनांक 13/11/222 रोजीचा अहवाल जोडलेला आहे. सदर अहवाल महत्वपूर्ण असून वस्तुस्थिती दर्शक आहे.

सदर अहवालातील कोणतेही मुद्दे सचिव यांनी फेटाळलेले नाहीत. तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक 8117/2022 व ईतर संलग्न, याचिके मध्ये मा. उच्च न्यायालयाने 7 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समितीच्या निवडणूका पारदर्शक व निपक्षपाती होणे करीता प्रशासकाची नेमणूक करणे बाबत आदेश दिलेले आहेत.

त्या नुसार सदर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासकाच्या अहवालातील अभिप्राय महत्वपूर्ण आहेत.

सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर यांनी व्यापारी मतदार संघामध्ये 2 वर्ष पूर्ण न झालेल्या 319 अपात्र व्यापाऱ्यांची नावे मतदार यादीमध्ये बेकायदेशीरपणे  व नियमबाह्यरीतीने समाविष्ठ केल्याचे दिगंबर नन्दू गोटमुखले यांनी दाखल केलेल्या आक्षेप अर्जावरील सुनावणी मध्ये सिध्द झालेले आहे.

ही बाब सुध्दा हुडे यांच्या अर्जावर निर्णय देताना विचारात येणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. स्वतः सचिवांनी सुनावणी दरम्यान सदर 319 व्यापान्यांना दोन वर्ष पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सदर अपात्र नावे वगळावीत असे म्हणणे मांडलेले आहे.

स्वतः अपात्र नावाचा समावेश करून सदोष मतदार यादी तयार करावयाची व नंतर सदर नावे वगळणे बाबत भूमिका मांडावयाची सदरची सचिवाची कृती ही मुक्त व मोकळा (Free & fair) आणि पारदर्शक व निष्पक्षपातीपणे निवडणूका घेण्याच्या तत्वाला हरताळ फासणारी आहे, असे खेदाने नमुद करावे वाटते. हीच बाब हुडे यांचे बाबतही लागू होते.

सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.उदगीर यांनी सादर केलेले लेखी म्हणणे व कार्यालयातील उपलब्ध रेकॉर्ड व उपरोक्त बाबीचे अवलोकन करता शिवाजीराव हाणमंतराव हुडे यांचा आक्षेप मान्य करणे योग्य आहे.

असे निरीक्षण नोंदवत एस. आर. नाईकवाडी, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) लातूर. महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 7 (3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालील प्रमाणे निर्णय दिले आहेत.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 7 (3) नुसार निर्णय
प्रारूप मतदार यादीवर दावे/हरकती सादर करावयाच्या विहित कालावधीत श्री दिगंबर गोखले यांनी दि.23/11/2022 रोजीच्या अर्जान्वये व्यापारी मतदारसंघातील मतदार यादी संदर्भात अर्ज दाखल करुन अर्जात नमुद 01 से 319 यधिक महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) (व) व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 6 (2) नुसार अर्हता दिनांकापासून 02 वर्ष पूर्वी पर्यंत वैध परवाना असने बंधनकारक आहे. आक्षेप अर्जातील अ.क्र. 01 ते 319 वरील परवाना धारक है अर्हता दिनांकापूर्वी 02 वर्ष परवाना धारण करत नाहीत.

त्यांचे नाव बेकायदेशीर रित्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे. तरी सदरील नाव मतदार यादीतून वगळणेची विनंती केली आहे.

सदर आक्षेपाचे अनुषंगाने या कार्यालायाचे पत्र जा.क्र. निवडणूक / उदगीर/प्रामया/आक्षेप / 2022 दिनांक 23/11/2022 अन्वये आक्षेप अर्जात नमुद सर्व 01 ते 319 गैरअर्जदार यांना दिनांक 25/11/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून आक्षेपाचे बाबतीत लेखी म्हणणे सादर करणे बाबत कळविण्यात आले होते.

सदरील नोटीस संबंधीतांना तामिल करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर यांना प्राधिकृत करण्यात आलेले होते.

सदर आक्षेपाचे अनुषंगाने दि. 25/11/2022 रोजी या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सदरील सुनावणीस अर्जदार श्री दिगंबर नन्ह गोटमुखले व त्यांचे वतीने ऍड. डी. एस. पांचाळ हे हजर होते.

गैर अर्जदार क्र.8) विजयकुमार नागोराव बलांडे, 14) रविंद्र विश्वनाथ लडे 30 ) अशोक अंकुशराव साळुंके, 1823 प्रकाश भिमराव जिरगे, 221) सुनिल लक्ष्मणराव पटवारी, 298) सचिन शिवाजीराव हुडे. हे हजर होते.

सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर हे सुनावणीस उपस्थित होते. त्यांनी लेखी म्हणणे मांडले कि, आक्षेप वर्गातील 01 से 319 परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीने अनुज्ञाप्ती दिलेली आहे.

तथापी सदरील अनुज्ञाप्तीमा दिनांकास 02 वर्षाचा कालावधी पूर्ण न झाल्याने आक्षेप कर्त्याचे म्हणणे ग्राहय धरून अंतीम मतदार यादीतून नाव वगळण्यात यावेत. असे लेखी म्हणणे सादर केले आहे.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. उदगीर हे सुनावणीस हजर होते. बाजार समितीच्या अभिलेख्याची पाहणी केली असता आक्षेपधारकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार फर्मचा परवाना महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 6 (2) नुसार अधिनियमाच्या कलम 13 (1) (ब) मधील तरतुदीनुसार अहंता दिनांकापूर्वी 102 वर्ष अगोदर पर्यंत वैध परवाना धारण करीत नसल्याचे दिसून आल्याने आक्षेपधारकाचा आक्षेप मंजूर करून संबंधीताचे नाव मतदार यादीतून वगळणे योग्य होईल, असा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे.

या कार्यालयाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उदगीर यांचेकडे संबंधीतांना सामिल करण्यासाठी दिलेल्या एकूण 319 नोटीस पैकी 251 व्यक्तींना नोटीस तामिल झाले नसल्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. उदगीर यांनी दिनांक 25.11.2022 रोजी सुनावणी दरम्यान कळविले.

संबंधितास नोटीस तामील झाली नसल्याने ते सुनावणीस उपस्थित राहिलेले नाही हि वस्तुस्थिती विचारात घेवून सदरील सुनावणी तहकूब करून दिनांक 28/11/2022 रोजी दुपारी 03.00 वाजता पुन्हा ठेवण्यात आली.

त्या करीता या कार्यालयाने दिनांक 27/11/2022 रोजी सकाळ या वर्तमानपत्रात जाहिर सुनावणी नोटीस प्रसिद्ध करुन नोटीस तामील झाली नसलेल्या 251 परवाना धारकांना दिनांक 28/11/2022 रोजी दुपारी 03 वाजता या कार्यालयात सुनावणीस समक्ष उपस्थित राहून म्हणणे सादर करणे बाबत कळविण्यात आले होते.

तेव्हा उपस्थित राहून या पूर्वी दिनांक 25.11.2022 रोजी दाखल केलेले म्हणणे ग्राहय धरुन संबंधीतांचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळण्यात यावेत असे म्हणणे मांडले.

तहकुब करण्यात आलेल्या सुनावणीचे कामकाज दिनांक 28.11.2022 रोजी दुपारी 3.00 वाजता सुरु करण्यात आले. सदर सुनावणीस अर्जदार श्री दिगंबर नन्तु गोखले यांचे वतीने ऍड. डी. एस. पांचाळ हे हजर होते.

गैरअर्जदार यांना वर्तमान पत्रात जाहिर सुनावणीची नोटीस देवून म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देवूनही ते गैरहजर सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. उदगीर यांनी सुनावणीस

सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.उदगीर यांनी सादर केलेले लेखी म्हणणे व सुनावणी दरम्यान सादर केलेल्या रेकॉर्डचे अवलोकन करता आक्षेप अर्जात नमुद 01 ते 319 परवानाधारक हे महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 6 (2) नुसार अधिनियमाच्या कलम 13 (1) (ब) मधील तरतुदीनुसार अहंता दिनांकापूर्वी 02 वर्ष अगोदर पर्यंत वैध परवाना धारन करीत नसल्याची माझी खात्री पटल्याने, मी. एस. आर.नाईकवाडी, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) लातूर, महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या समितीची निवडणूक) नियम 2017 ये नियम 7 (3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालील प्रमाणे निर्णय देत आहे.

अर्जदाराचा आक्षेप मंजूर

व्यापारी मतदार संघाच्या मतदार यादीतील सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये नमुद केलेल्या अ.क्र. 01 ते 319 व्यक्तीची/व्यापान्यांची प्रारूप मतदार यादीत समाविष्ठ असलेली नावे वगळून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here