सुशिक्षित तरुणांचा स्तुत्य उपक्रम “माझं गावचं माझी शाळा”

बातमी ऑनलाइन विशेष लेख

खेड्याकडे चला  हा संदेश – महात्मा गांधीनी दिला होता. कारण खेडे हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे. कारण आपल्या भारत देशात 70 % जनता ही ग्रामीण भागात राहते. आजही 50 ते 60% जनतेला प्रत्यक्ष रोजगार देते ते क्षेत्र म्हणजे शेती. आत्मनिर्भर भारत म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येत ते म्हणजे आपलं गाव.

गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरून देशाची परीक्षा।
गावची भंगता अवदशा। येईल देशा।। ग्रामगीता ।।

याचं गावातील आम्ही विद्यार्थी बाहेर शिकत असतांना corona या महामारी मुळे गावात परत आलो. कारण lockdown मुळे शहरात आम्हाला असुरक्षित वाटत होत. कोरोनामुळे संपूर्ण देशातील शाळा,महाविद्यालय बंद आहेत.हिच परिस्थिती आमच्या गावात पण होती.त्यामुळे आमच्या गावातील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याच आम्हाला खूप वाईट वाटत होते.कारण शिक्षण हाच एक महत्त्वाचा आणि योग्य मार्ग आहे जो आपल्या समाजाला, गावला, देशाला योग्य दिशेने जायला मदत करतो.

आम्ही गावातील मुलांची शैक्षणिक परिस्थिती बघितली तर त्यांना शिक्षण द्यायची गरज आम्हाला वाटली कारण म्हणतात ना चांगल्या सवयी लवकर सुटतात ,तसेच आमच्याहि गावात झाले. आमच्या गावातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय, गोडी कमी झाली होती.(स्वनिरीक्षण) आणि यासाठी आम्हाला यावर उपाय, मार्ग काढायचा होता. परंतू शासनाच्या आदेशानुसार आम्हाला काळजी पण घ्यायची होती. तेव्हा आम्हाला एक संकल्पना सुचली. (यात प्रसारमाध्यमांच पण योगदान आहे.)

 

 

ती म्हणजे”माझं गाव माझी शाळा” आणि ही संकल्पना मित्रांना सांगितली तर मग काय? लागलो आम्ही तयारीला. पण खरा प्रश्न होता तो आर्थिक (कारण आम्ही सगळेच विद्यार्थी आहोत आणि सध्या बेरोजगार पण म्हणा) त्यावर आम्ही वर्गणी काढायच ठरवलं.तेव्हा आम्हाला गावातील,गावाजवळील दानदात्यांनी मदत केली. (त्यांचे मनापासून आभार) आणि चालू झाला एक छोटासा उपक्रम. यात आम्ही रोज सायंकाळी 5 ते 6 (1 तास) मोफत class घेतो. आम्ही सगळे तरूण मित्रांनी गावातील भिंतीवर (ABCD, 1 ते 100 पर्यंत पाढे, 2 ते 10 पर्यंत पाढे, अ ते ज्ञ पर्यंत बाराखडी, दिशा, मराठी/इंग्रजी महिने, वार इत्यादी ) लिहिले.

याचा फायदा असा होत आहे की गावातील विद्यार्थी खेळता खेळता शिकत आहे. त्यांना अभ्यासाची गोडी लागत आहे. आणि त्यामुळे आम्हाला आमच्या शिक्षणाचा समाजाला काहीतरी उपयोग होत आहे याचं समाधान पण मिळालं. कारण समाजाच, गावाचं, देशाचं कल्याण करण्यासाठी फक्त खूप “मोठया मोठ्या” गोष्टीच कराव्या लागतात यावर माझा विश्वास नाही, तर ते काही “छोट्या छोट्या” गोष्टींतूनही साध्य होऊ शकत अस माझं मत आहे.

कारण शेवटी मी माझा देश बदलू शकतो का? याबाबत साशंक आहे परंतु मी माझं गाव नक्कीच बदलवू शकतो (चांगले उपक्रम राबवून)यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि असा विचार देशातील आणि प्रत्येक गावांतील तरुणांनी केला तर आपला भारत देश पण नक्कीच समोर गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.

(हे सगळे उपक्रम सुरक्षेची काळजी घेऊनच आणि social distancing च पालन करूनच करण्यात आलेले आहेत (काही अपवाद वगळता).

वैभव वनिता बाबा ठाकरे B.E.(Mechanical)
मु.पो.आंबोली ता.चिमूर जिल्हा. चंद्रपूर
मो. नं. -8806618305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *