work from home

‘वर्क फ्रॉम होम’बाबत सरकारचा मोठा निर्णय

राज्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –  कोरोंनामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात टप्याटप्याने डाउन आहे. काही कंपनी तसेच विद्यापीठ, महाविद्यालये  आपल्या कर्मचार्‍यांना  ‘वर्क फ्रॉम होम’   करायला लावत होते.

अजूनही काही जन ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत.  आणि हा कोरोंनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. कारण यामुळे एकमेकांच्या संपर्कात कोणीही येत नसल्याने  कोरोंनाची बाधा होत नाही. दिवसेंदिवस  कोरोंना बाधितांची सख्या ही वाढतच आहे. कारण लोकांना आता काम करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच  सरकारने नुकताच  याविषयी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता टेलीकॉम विभागाने आयटी आणि आयटीइएस क्षेत्राला या वर्षी डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती दिली आहे. याआधी वर्क फ्रॉम होमची मुदत ही जुलै महिन्यापर्यंत होती मात्र आता ती वाढून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी म्हणाले, सरकारच्या या पाठिंब्यामुळे कामातील गुणवत्ता आणि सातत्य वाढवण्यास मदत मिळणार असून सरकारने काम करण्याच्या नव्या पद्धतीला पाठिंबा दिल्याबद्दल सरकारचे आभार. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशातील 43 लाख आयटी कर्मचाऱ्यांपैकी 90% कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.

यामुळे कोरोंनाचा संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात नक्कीच मदत होणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *