कोरोना काळात लग्न झाले “स्वस्त”

विशेष लेख

देशात कोरोना विषाणूने जगात थैमान घातले असून रोज याचे स्वरूप वाढतच आहे.  यात केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केले होते. त्यानंतर त्याचे 4 टप्पे  केले गेले.  यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार काही प्रमाणात का होईना रोखण्यात  यश आले. मात्र तरीदेखील  कोरोंनाचे रुग्ण  दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लॉक डाऊन काळात सर्वच उद्योग धंदे पूर्ण बंद पडले होते.

सुरूवातीला पूर्णपणे  कडक बंदोबस्त पळून लॉक डाऊन पाळण्यात आले. परंतु सरकारने काही उद्योग धंदे व कार्यक्रमांना शासनाने सशर्त मंजूरी दिली. सशर्त म्हणजे 50 लोकांच्या उपस्थितीत हे विवाह सोहळे व इतर कार्यक्रम पार पडले.

कोरोनाच्या काळात सर्वांना आर्थिक फटका बसला पण याच कोरोंनाच्या काळात लग्न मात्र स्वस्त झाली. कारण जे लग्न 5,00,000 रु. (पाच लाख रुपये) मध्ये देखील लागत नव्हते तेच लग्न आज 50,000 रु. (पन्नास हजार रुपये) रुपयात पार पडत आहे.  भरपूर समाज सुधारक, कीर्तनकारांनी सांगितले,  लग्न साधे करा जास्त पैसा खर्च करू नका. परंतु  खोट्या प्रतिष्ठेमुळे  काही जणांना आपल्या शेतजमिनी गहाण ठेवाव्या लागल्या,  काहींना  विकाव्या लागल्या.   या देशात हुंड्यापायी लाखो लेकी-बाळींना आपले प्राण गमावले लागलेत, तर कित्येक महिलांच आयुष्य उद्धवस्त झालय. समाजात काही सामाजिक संघटनांनी हुंडाविरोधी चळवळ सुरु केली. पण या चळवळीचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात हुंडा घेऊनच लग्न केली जात होती. जे सधन होते ते हुंडा देत होते, पण एखादं गरीब कुटुंब असेल त्याच्याकडे हुंडा देण्यासाठी पैसा नसेल, तर त्यांच्या मुलीचे लग्न होत नव्हते. लग्न म्हंटले कि “ लग्न कस थाटात झाले पाहिजे” आणि खर्च हा नवरीच्या घरच्यांकडून अशी परंपराच इथे होती, मुलीचे आई-वडील देखील आपल्या मुलीचे चांगले होऊदे यासाठी कर्ज काढून लग्न लावतात. या हुंड्याच्या काळजीमुळेच कित्येक मुलींनी व तीच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्या आहेत.

पण  “कधीही न सुधारणारा समाज (लोकांची मानसिकता)  ह्या कोरोनामुळे  सुधारला हे बाकी नक्की.”

परंतु सध्यातरी ती नाहीसी होताना दिसत आहे, कोरोना विषाणूमुळे जो एक समाजाला परंपरेने चिकटलेला घातक विषाणू (हुंडा) तो संपुष्टात येताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा कहर संपूर्ण देशात पसरला आहे, त्यामुळे आपल्या मुलांचे लग्न होईल कि नाही याचा मोठा पेज पडला आहे. सध्या परिस्थिती अशी आहे कि “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” अशी गत होऊन बसली आहे.

कोरोना काळात साधेपणाने लग्न किंवा कोर्ट विवाहास लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे तरी हुंडाबळी, आर्थिक अडचण, कर्ज बाजारीपणा यामुळे अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत. तसेच हुंडा बळी ही प्रथा कोरोनामुळे संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प आहेत, तर लग्न कार्यालय, तसेच जास्त लोकांनी एकत्रित येण्यास बंधी आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात मुलीकड्च्यांचे कार्यालयाचे, मानपानाचे, जेवणाचे, इत्यादी अशे अनेक खर्च वाचत आहेत.

कोरोना काळात लग्न केले व वधू-वर आणि वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल झाला कारण त्यांनी  कोरोना पसरु नये म्हणून बंदी आदेश असतानाही वऱ्हाड्यांनी केलेल्या गर्दीमुळं लातुरातल्या एका लग्नात विघ्न आलंय. वऱ्हाड्यांच्या गर्दीत लातूरमध्ये लग्न लावणाऱ्या नवरा-नवरी आणि वधूवर पित्यांवर गुन्हा दाखल झालाय. या शिवाय मंडपवाला आणि पुरोहितावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी बातमी वाचली.

परंतु असे असतानाही मात्र  कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील एका अनोख्या लग्नाची गोष्ट आहे.  सीआरपीएफमध्ये काम करणारे अर्जुनवाडीचे सुपुत्र अभिजीत दोरगुडे लग्नासाठी गावात दाखल झाले होते. कुदनुर गावची सुकन्या रुपाली निर्मळकर हिच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला होता. पण लॉकडाऊनची घोषणा झाली आणि धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी केलेली सगळी तयारी वाया गेली. पण दोन्ही कुटुंबांनी यातून अनोखा मार्ग काढला.

लग्नाला यायचं नाही हं !

सोशल मीडियातून सर्वांना लग्नपत्रिका पाठवली गेली. ती देखील लग्नाला न येण्यासाठीची…. पण लग्नाला न येता लग्न सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती मात्र पत्रिकेत होती. लग्नसोहळा फेसबुकवर लाईव्ह असेल. जिथे असाल तिथूनच या सोहळयात सामिल व्हा आणि तिथूनच अक्षता टाकून आशीर्वाद द्या…. तुम्ही घरातून बाहेर न पडता कोविडविरोधात सरकारला मदत करणं हेच आमच्यावरचं प्रेम समजू, असा ह्रदयस्पर्शी संदेश दोरगुडे आणि निर्मळकर कुटुंबीयांनी दिला होता.

मदतनिधीत देणगी हाच आमचा आहेर!

विशेष म्हणजे लग्नासाठीच्या निमंत्रणात दोन्ही कुटुंबीयांनी आहेराची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी दोन बँक खात्यांचा तपशीलही दिला. अर्थात ही बँक खाती दोन्ही परिवारांची नव्हती. तर एक होतं पीएम केअर्स फंडाचं आणि दुसरं मुख्यमंत्री सहाय्यता (कोविड-१९) निधीचं. या खात्यावर निधी जमा करा. त्याची आम्हाला आलेली पोचपावती हाच आमचा अहेर, असा सामाजिक भान देणारा संदेश पत्रिकेत होता.

असा एक सामाजिक भान ठेवून  अनोखा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याची चर्चा सर्वदूर होती.  असेच लग्न सोहळे यापुढे होणे काळाची गरज आहे.  कारण भरपूर बापानी लग्नाच्या हुंड्यासाठी आत्महत्या केल्या तर काहींनी शेती विकल्या.  साधेपणाने लग्न किंवा कोर्ट विवाह हीच प्रथा पुढे रुजू व्हावी हीच अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *