आयपीएल (IPL) बाबत होणार महत्वाचा निर्णय

क्रीडा

  मुंबई –   ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ‘टी-20’ विश्वचषकाचे आयोजन आयसीसीने पुढे ढकलल्यामुळे यावर्षीच्या IPL हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे.  कोरोनामुळे IPL स्पर्धांच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता याविषयी IPL गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी महत्वाचे विधान केले आहे.

IPL गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश  पटेल म्हणाले,  10 दिवसांमध्ये होणाऱ्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठकीत IPL च्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय झाल्यावर त्याची घोषणा होईल.  याआधी ठरल्याप्रमाणे सध्यातरी आयपीएलचे आयोजन हे 60 सामन्यांसह होणार असून यावर्षीची स्पर्धा युएई मध्ये भरवली जाण्याची दाट शक्यता आहे.

सदरील हंगामाची स्पर्धा ही प्रेक्षकांविना खेळवली जाणार असल्यामुळे फारश्या समस्या किंवा अडचणी येणार नाहीत, असेही पटेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या काळात बीसीसीआय IPL चे आयोजन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *