korona

जिल्ह्यात आज नवीन ७५ कोरोनाबाधित रूग्ण

जळगाव

जळगाव (प्रतिनिधी) – आज जिल्ह्यात नवीन ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत एकूण कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता २१४९ इतकी झालीय. यातील 1339 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 164 जणांचा मृत्यू  झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पारोळा ३७, जळगाव शहर १२, भुसावळ ९, अमळनेर ४, धरणगाव २, यावल २, एरंडोल ३, जामनेर १ तर रावेरच्या ५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, पारोळ्यात एकाच दिवसात ३७ रुग्ण आढळून आले आहे. तर संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *