गोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील

जामनेर बातमी ऑनलाइन

केकतनिंभोरा ता.जामनेर (प्रतिनिधी)-  येथील शेतकरी यांनी वारंवार कनिष्ट अभियंता यांना विनंती करून देखील गोंडखेल शिवारातील ग्रुप 9 चे ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर मिळावे यासाठी 15 ते 20 दिवसापासून पाठपुरावा करत असताना देखील ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने आज केकतनिंभोरा येथील शेतकरी यांच्या सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी वरिष्ठ अभियंता बारेला साहेब यांची भेट घेतली व निवेदन स्वरूपात नवीन ट्रान्सफॉर्मर व कनेक्शन ट्रान्स्फर ची विनंती केली. गोंडखेड व केकतनिंभोरा येथील समस्त शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे ,शेतकऱ्यांच्या हाथातोंडाशी आलेला घास असा ट्रान्सफॉर्मर अभावी वाया जाणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे ,

अश्या अवस्थेत शेतकऱ्यांना कुणीच वाली नसल्याचे चित्र लक्षात येत असतांना शेतकरी वारंवार महावितरण च्या पायऱ्या झिजवत आहे , याबरोबर हे ट्रान्सफॉर्मर 100 के व्ही चे असल्याने व यावर लोड जास्त असल्याने हा ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असल्याच्या ही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे यावर सर्व शेतकऱ्यांनी पर्यायी म्हणून अजून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर ची मागणी केली आहे व हे ट्रान्सफॉर्मर मिळायला वेळ लागणार असेल तर जवळच असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर वर आज फक्त 7 ग्राहकसंख्या असल्याने गोंडखेल ग्रुप 9 वरील 7/8 कनेक्शन ट्रान्स्फर करून ग्रुप 9वरील लोड कमी करण्यात यावा ही विनंती देखील करण्यात आली आहे जेणेकरून नवीन ट्रान्सफॉर्मर आल्यावर तो पुन्हा जळणार नाही व दोन्ही ट्रान्सफॉर्मर वर 15 /20 च्या आत ग्राहक संख्या असल्याने ट्रान्सफॉर्मर च्या क्षमतेनुसार कनेक्शन व लोड राहील व पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळणार नाही ही बाब
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी वरिष्ठ अभियंता बारेला साहेब व कनिष्ठ अभियंता महाजन साहेब यांच्या लक्षात आणून दिली आहे
हे सर्व लक्षात आणून दिल्यानंतर ही या पद्धतीने कार्यवाही नाही झाली व आजरोजी ची ग्रुप 9वरील ग्राहक संख्या 26 व अनधिकृत 8ते10 यांचा लोड कायम राहिला व पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळल्यास मनसे आपल्या स्टाईल ने जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.

तसेच येत्या दोन दिवसात महावितरण कडून नवीन डी पी व कनेक्शन ट्रान्स्फर बाबत हालचाल न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरण च्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे.  निवेदन देतांना मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील ,तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील ,ता सचिव अनिल मोरे व आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *