जळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न

जामनेर बातमी ऑनलाइन

जळगाव (प्रतिनिधी)- येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक  दि 20  रोजी   पार पडली .

यावेळी प्रमुख अतिथी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर ,नाशिक मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके ,कौशल्य पाटील ,सौरभ सोनवणे ,विजय आगडे,जळगाव मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे , आदी पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी मनविसे जिल्हा कार्यालया  ही उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बैठक पार पडली या बैठक यशस्वीतेसाठी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील यांनी कमान हाती घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनविसे जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील व आभार प्रदर्शन जामनेर चे मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले, सदर बैठक योग्य प्रकारे पार पाडण्यात जळगाव चे मनविसे नेते योगेश पाटील व पंकज चौधरी ,संदीप महाले ,अमोल वाणी जळगाव मनविसे टीम चा मोलाचा वाटा आहे
तसेच या बैठकीला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील मनविसे च्या लवकर नियुक्त्या ही होणार असल्याचे मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील. जामनेर मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील व जामनेर चे मनविसे तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील ,मयूर पाटील ,सागर पाटील ,ता सचिव अनिल मोरे ,वाल्मिक कोळी ,राजेंद्र पांढरे ,शुभम चौधरी ,रोशन पाटील ,अक्षय तेली सह आदी मनविसे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *