मुंबई (वृत्तसंस्था)- मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही त्याला पूर्णपणे हे राज्य सरकार जबाबदार आहे. मराठा आरक्षण संबंधित यांनी सकारात्मक भूमिका मांडण्याची गरज होती. मराठा आरक्षण संबंधित राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेले आहे. अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली
एवढंच नाही तर कंगणा राणावत हिच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. तिचे बांद्रा येथील ऑफिस तोडण्यात आलेला आहे. कंगना मुंबई नसताना २४ तासाच्या आत मध्ये नोटीस देऊन ते घर पाडण्याचं काम या महानगरपालिकेने केलेलं आहे. कंगनाच्या ऑफिसच्या आत मध्ये जाऊन तोडफोड करण्याची परवानगी त्या अधिकार्यांना कोणी दिली याबद्दल चौकशी झाली पाहिजे.
कंगणाला न्याय दिला पाहिजे या पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल यांनी मला आश्वासन दिलं आहे कंगनाला न्याय मिळवून देण्याचे काम मी करेन. तसेच सध्या उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आलेले आहे.