जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण

औंरगाबाद

जळगाव  (प्रतिनिधी)– जिल्ह्यात आज  कोरोनाचे तब्बल १०९८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३६ हजार ४४० एवढी झाली आहे. आज दिवसभरात १९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३७० , जळगाव ग्रामीण ५१, भुसावळ ७४, अमळनेर १०६, चोपडा ९७, पाचोरा ४६, भडगाव ११, धरणगाव ५१ , यावल २३, एरंडोल ३९, जामनेर १२, रावेर ७१, पारोळा १८, चाळीसगाव ७२, मुक्ताईनगर २९, बोदवड १४, इतर जिल्ह्यातील १४ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ४, पाचोरा  ४, भुसावळ ३, धरणगाव ३, भुसावळ २, चोपडा २, भडगाव , जामनेर ,एरंडोल , यावल , प्रत्येकी तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *