अशोक पाटील
नेरी (प्रतिनिधी)- येथे गेल्या अनेक दिवसापासून विजेचा लंपडाव असून असून विजेचा भर कमी करण्यासाठी दुसरीकडे दुसरे रोहित्र बसविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरण कंपनीला देण्यात आले. नेरी हे गाव जामनेर तालुक्यात मोठे गाव असून हे महामार्गावर असल्याने वर्दळीचे गाव असून आजूबाजूच्या 15 खेडे या गावाला जोडले आहे. या ठिकाणी अनेक दिवसापासून सकाळी व संध्याकाळी रोज लाईट लंपडाव खेळत असते.
आताचे दिवस हे पावसाळ्याचे असल्याने डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो यातच रात्री विज उपलब्ध असल्याने नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोगयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही कंपनी या गोष्टीकडे जाणून बूजन दुर्लक्ष करीत आहे. एका रोहित्रावर जास्त भार येत असल्याने दुसरे रोहित्र उपलब्ध करून बसविण्यात यावे अशी मागणी देखील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. नेरी येथील नागरिकांची समस्या लवकरात लवकर दूर करावी. अन्यथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या दालनात उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसे उपाध्यक्ष अशोक पाटील, मनसे जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मनसे जामनेर तालुका उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनी निवदेनाद्वारे दिला आहे.