बातमी ऑनलाईन

केकतनिंभोरा येथील पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मनसेचा पुन्हा एल्गार

जामनेर बातमी ऑनलाइन

अशोक पाटील 

जामनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील केकतनिंभोरा येथील होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात पुनःश्च आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा केकतनिंभोरा येथील मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी घेतला आहे.

ग्रामपंचायतने लाखो रु खर्च करून गावात भारत निर्माण योजना कार्यान्वित करण्यात आली खरी मात्र गावाला नेमका याच पाण्याचा लाभ होत नसल्याने व गावातील शासकीय विहिरीत शौचालय व नदीचे पाणी जात असल्या कारणाने गावात अनेक लोक सर्दी ,खोकला ,चहा फुटणे व इतर पोटाचे आजार होत आहे. यासर्व बाबींचा विचार करून काही दिवसांपूर्वी मनसे ने आंदोलन करून वाघूर च्या पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची बसकी टाकीचे बांधकाम करण्यात आले खरे मात्र ती टाकीच गळकी असल्याच्या संशयाने टाकीच भरली जात नसल्याची चर्चा आहे तसेच वाघूर योजनेतील पाण्याच्या टाकीचा व्हाल खराब असल्या कारणाने ती टाकी ही भरली जात नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी आठवडा भर वाट पहावी लागत असल्याची तक्रारी आहे. म्हणून गावात वाघूर चा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी मनसे चे अशोक पाटील पुन्हा मैदानात उतरले आहे

गावाचे व ग्रामस्थांचे अधिक हाल न पाहता लवकर वाघूर चा शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा ही मनसे विनंती अन्यथा 15 सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या समोर टेंट टाकण्यात येणार याची नोंद घ्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *