अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

जळगाव बातमी ऑनलाइन
जळगाव, (जिमाका) दि. 9 – शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांच्या 110 व्या अ भा व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता सदर परीक्षा ही दि. 18 ते 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती आर. पी. पगारे, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल, 2020 पर्यंत पुर्ण झाले आहे. व त्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरला असून बीटीआरआय केंद्रात परीक्षा फी जमा केली आहे. अशा सर्व पात्र उमेदवारांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही श्री. पगारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *