डॉ. रामचंद्र साबळे

केरळमध्ये मान्सून १ जून तर, मुंबईत १० जून पर्यंत होणार दाखल – डॉ. रामचंद्र साबळे

राज्य

पुणे : देशात आणि राज्यात मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्याने मान्सून लवकर पुढे सरकत नाहीये.  मात्र केरळमध्ये मान्सून १ तारखेला दाखल होणार आहे.  कोकणात ५ तारखेला तर मुंबईत १० तारखेला दाखल होईल, तर  संपूर्ण राज्यात १२ तारखेच्या पुढे मान्सून सक्रीय होईल अशी माहिती हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलीये.

हिंदी महासागरात सध्या १ हजार १० हेप्टापास्कल, तर अरबी समुद्र आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर १ हजार ८ हेप्टापास्कल आणि राज्यात १ हजार ६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. तसेच हवेचा दाब जास्त असला तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने मान्सून लवकर पुढे सरकण्यास वाऱ्याचा मोठा अडथळा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *