संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित डोवाल यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

आंतरराष्ट्रीय बातमी ऑनलाइन राष्ट्रीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे.   पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. आता सीमेवर टँकही तैनात करण्यात आलेत. या दरम्यान राजधानी दिल्लीतही हालचालींना वेग आलाय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी याच मुद्यावर एक महत्त्वाची बैठक बोलावली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित डोवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भारत – चीन तणावासंबंधी चर्चा केली. तसंच लडाखमधील सद्य परिस्थितीबद्दल माहिती घेतली. डोवाल यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील याच मुद्यावर आणखीन एक बैठक बोलावणार असल्याचं समजतंय. या बैठकीत वरिष्ठ अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *