ब्रम्हपुरी तालुक्यात ४० वर्षातील सर्वात मोठी आपत्ती – ना.विजय वडेट्टीवार

बातमी ऑनलाइन राष्ट्रीय

चंद्रपूर (वृत्तसंस्था)-  गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस वर्षात कधीच एवढी बिकट पूर परिस्थिती झाली नव्हती, ती परिस्थिती आता ओढवलेली आहे. असे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

सध्या  आठ गावांच्या सभोवताली पाणी असुन काही घरे पूर्णतः बुडालेले आहेत. लोक घराच्या छतावर उभे आहेत. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. तसेच पूर ओसरल्याशिवाय काहीही करता येत नाही पण नागरिकांना जेवढं आवश्यक साहित्य आहे ते पोहचवण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे. परंतु इतके प्रचंड नुकसान गेले ४० वर्षात अजूनही झालेलं नाही तेवढ नुकसान यावर्षीच्या पुरात झालेलं आहे. सर्व परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि ती शब्दात व्यक्त करता येत नाही अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *