भारत चीन सीमेवर तणाव वाढला

आंतरराष्ट्रीय बातमी ऑनलाइन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-  बऱ्याच दिवसापासून भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे.   पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दरम्यान चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय लष्कराला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये सध्या तणाव आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर  आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *