बुलडाणा जिल्ह्यात 288 ग्रामपंचायत सरपंचाचा कार्यकाळ संपणार; पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी प्रशासक होणार

बुलढाणा
बुलडाणा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 228 ग्रामपंचायत मधील सरपंचाचा कार्यकाळ संपल्याने व निवडणूक झाल्या नसल्याने या सर्व ग्रामपंचायत वर पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर येत्या 8 सप्टेंबर रोजी 289 ग्रामपंचायती चा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने त्यावर देखील प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण 870 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी या वर्षात 528 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र कोरोनाच्या जागतिक संकटाने ह्या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे 228 ग्रामपंचायतींच्या सरपंचाचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट रोजी संपला असून 8 सप्टेंबर रोजी 289 ग्रामपंचायतींचा देखील कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर विविध विभागातील पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती
जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *