भाजपाचे पुण्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन

पुणे बातमी ऑनलाइन

पुणे  (वृत्तसंस्था)-  राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे  मागील चार महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्ग  होऊ नये म्हणून बंद आहेत. मात्र काही राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. पण अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होत नसल्याने, आज राज्यभर भाजपाच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात देखील सारसबाग येथील गणपती मंदिराबाहेर भाजपच्यावतीने टाळ वाजून आणि गोंधळ घालून, तर ॐ कारेश्वर मदिराबाहेर खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात घंटानाद करत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *