पुण्यात मास्क न वापरल्यास भरावा लागेल दंड – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोंना अपडेट पुणे बातमी ऑनलाइन
पुणे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या बाणेर येथील कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खा. गिरीश बापट भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आ. मुक्ता टिळक, आ.माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजक, महानगर पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना चांगला उपयोग होईल. तसेच आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असेल, मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसेच सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले. हे कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *