भुसावळ येथील विलास चौधरी हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे बातमी ऑनलाइन भुसावळ

भुसावळ ( प्रतिनिधी )- दोन दिवसापूर्वी शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवाशी विलास चौधरी यांना चाकूने भोकसून व गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता.  या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी  सापळा रचून अटक केली.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. कॉ विकास सातदिवे यांना गुप्त खबऱ्यांनी हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक खबर दिल्यांनंतर सापळा रचून त्यांना वांजोळा रोड भागातून अटक करण्यात आली . अक्षय न्हावकर ( रा – चक्रधर नगर ), आकाश पाटील ( नारायनानगर ) आणि अभिषेक शर्मा ( चमेली नगर ) अशी या आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पो. नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो . नि. अनिल मोरे , पो हे. कॉ . सुनील जोशी पो ना. रमण सुराडकर , किशोर महाजन , समाधान पाटील , रवींद्र बिर्हाडे , महेश चौधरी , पो . कॉ विकास सातदिवे , प्रशांत परदेशी , कृष्ण देशमुख , अय्याज खान यांच्या पथकाने हा सापळा रचला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *