दुचाकी वाहनांच्या किंमती होणार कमी

बातमी ऑनलाइन राष्ट्रीय

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकार दुचाकींवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करीत असल्याने  दुचाकी वाहनांच्या किमती कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.  बाइक आणि मोपेडसारख्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने दुचाकीवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवल्यास हे शक्य आहे, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले.  सीआआयशी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या वर्षभरापासून वाहन उद्योगाची स्थिती बिकट असून, त्यात आता करोनाची भर पडली आहे. वाहन उद्योगाने विनंती केल्यानुसार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचा दर कमी करण्यावर चर्चा होईल, असे सीतारामन यांनी सीआयआयशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. राजीव बजाज यांच्या मते वाहन उद्योग गेले वर्षभर अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळे जीएसटीचे दर कमी करून उद्योगाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यास ग्राहक आणि वाहन उद्योगालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *