थोड्याच वेळात जीएसटी कौन्सिलची बैठक ; ‘या’ वस्तू होणार स्वस्त

बातमी ऑनलाइन राज्य राष्ट्रीय व्यापार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या जीएसटी कौन्सिलची ४१ वी बैठक आज सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीत सरकारकडून निवडक वस्तूंच्या करात कपात करून सर्वसामन्यांना दिलासा देण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. असे twit ministry of finance ने केले आहे.

१ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू करण्यात आला. तेव्हापासून जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. तर जवळपास २०० वस्तू आणि सेवांचे कर या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये कमी करण्यात आले, असे सरकारने म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचा पट जनतेसमोर मांडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *