आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपुर बातमी ऑनलाइन
नागपूर  (प्रतिनिधी)- नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त  तुकाराम मुंडे यांची शासनाने बदली केली असून त्यांची नियुक्ती  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे सचिव या पदी केली आहे. त्यामुळे नागपूर महानगर पालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी. हे असणार आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात आज आदेश जारी केले.  तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *