भुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून

गुन्हे बातमी ऑनलाइन भुसावळ

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर भागात  विलास चौधरी नामक  38  वर्षीय तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी चाकू ने वर करीत गोळी झाडून हत्या  केल्याची घटना घडली आहे.  रात्री अकरा वाजेच्या सुमारास  झालेल्या या घटनेने भुसावळ शहर हादरले पूर्णपणे हादरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.

विलास चौधरी हा मुंबई वरून दोन ते तीन दिवस अगोदरच  गणपती उत्सवासाठी घरी आला होता. व काल रात्री हि घटना घडली. याचे कारण अद्याप समजले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचे समोर येत आहे.

या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत विलास चौधरी यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले. दरम्यान फरार मारेक-यांचा कसून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *