देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये

बातमी ऑनलाइन मुंबई

मुंबई  (प्रतिनिधी )- भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी व  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बिहारच्या भाजप प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. बिहारची निवडणूक ही पहिली डिजिटल निवडणूक आहे. या निवडणुकीचा प्रचारही डिजिटलच होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधा. सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून मतदारांच्या समस्या जाणून घेतानाच भाजपचे कार्यही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत मेहनत घेत आहेत. बिहारनेही मोदींना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही बिहारची जनता भाजपच्यामागे उभी राह्यला हवी, असं फडणवीस म्हणाले. बिहारमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. या तरुणांपर्यंत सोशल मीडियाच्यामाध्यमातून पोहोचण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

1 thought on “देशातील पहिली डिजिटल निवडणूक बिहारमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *