धानवड येथील 18 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

गुन्हे जळगाव बातमी ऑनलाइन

 जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानवड येथे १८ शेतकऱ्यांची एका कापूस व्यापाऱ्यांने  तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला होता़ याप्रकरणी तीन जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन जणांना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली आहे. प्रदीप रंगलाल पारधी (रा़ धानोरा ता़ चोपडा) व अनूप उर्फ गोलू ओमप्रकाश तिवारी (रा़ प्रजापतनगर, जळगाव) असे अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत.

अमोल भगवान व्यास (रा़ अयोध्यानगर) अनूप तिवारी, प्रदीप पारधी या तिघांनी पंधरा दिवसात पैसे देतो सांगून तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांचा ४ हजार ७०० रपूये दराने कापूस खरेदी केला़ २९ मे ते ९ जून या कालावधीत पूर्ण झाल्यानंतर या व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली़ त्यानंतर वाल्मीक एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणाºया तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *