ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात ; समर्थकांचे रस्त्यावर ठि्य्या आंदोलन

बातमी ऑनलाइन राज्य राष्ट्रीय

मुंबई  (वृत्तसंस्था)- राज्याचे ऊर्जामंत्री  व कॉंग्रेस नेते ना. नितीन राऊत हे  बांसामधील हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी  गेले होते. परंतु  पोलिसांनी ना. नितीन राऊत यांना आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी नाकारली व त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेसने याबाबत ट्विट  करत या घटनेची माहिती दिली असून  ना. नितीन राऊत  समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलन केले. काँग्रेसने  सदर कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *