नागपुर (प्रतिनिधी) – येथील उच्चशिक्षित दाम्पत्यानं दोन गोंडस मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रा. धीरज राणे (42 ), पत्नी डॉ. सुषमा राणे (38 ), मुलगा ध्रुव (11) आणि लावण्या राणे (8 )अशी मृतांची नावे आहेत.
कोराडी भागात राहणाऱ्या चौघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत आज दुपारी आढळून आले. सुषमा या धंतोली भागातील रुग्णालयात कार्डियालॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या, तर धीरज हे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होते. काल 12 वाजता आईशी बोलणे झाल्यानंतर ते झोपले. सकाळी दार उघडत नसल्यानं शेजाऱ्यांच्या मदतीनं दार उघडल्यावर ही घटना उघडकीस आली. धीरज यांचा मृतदेह पंख्याला गळफास लावल्याच्या अवस्थेत तर आई आणि मुलं बेडवर पडून होते. आत्महत्तेमुळं सुखी संसाराची अचानक राखरांगोळी झाली. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोराडी पोलीस तपास करत आहेत.