खासगीकरणा विरोधात वीज अभियंता कर्मचाऱ्यांच्या कृती समितीचे राष्ट्रव्यापी आंदोलन

अमळनेर जळगाव बातमी ऑनलाइन

अमळनेर (प्रतिनिधी)- संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आज १८ रोजी वीज क्षेत्रातील सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, वर्कर्स फेडरेशन व इंटक इ. संघटनांच्या कृती समितीद्वारे केंद्र सरकार लादू इच्छित असलेल्या वीज (दुरुस्ती) विधेयक 2020 व प्रस्तावित खाजगीकरणाचा काळ्या फिती लावून काम करुन सनदशीर मार्गाने निषेध करण्यात आला.

केंद्रशासित प्रदेशातील वीजवितरणाच्या, ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन (वाराणसी), ओडिशातील ३ डिस्कॉम आणि सीईएसयूचे खासगीकरण रद्द करणेकरीता वीज क्षेत्रातील कर्मचारी, अभियंते यांनी १८ ऑगस्ट रोजी निषेध करुन राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वी केले.
नागपूर, औरंगाबाद, जळगाव, आणि देशातील इतर ठिकाणी फ्रॅन्चायझीच्या माध्यमातून वीज क्षेत्राचे खासगीकरण अयशस्वी ठरल्यावर सुद्धा केंद्र सरकार केवळ खाजगी उद्योजकांच्या फायद्यासाठी वीज क्षेत्राचे खाजगीकरण करीत असल्याचा आरोप संघटना प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केला. तसेच निसर्ग चक्रीवादळ असो, महापूर असो किंवा कोणतेही संकट असो सरकारी वीज क्षेत्रातील अभियंते कर्मचारी हे ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर असतात हे मागील काही घटनांवरुन सिद्ध झाले आहे. असे देखील मत यावेळी मांडण्यात आले. शेतकऱ्यांना पूर्ण बील भरावे लागेल व शासनामार्फत देण्यात येणारी वीजबीलातील सवलत देखील काढून घेण्याची शक्यता आहे.

वीजक्षेत्र खाजगी भांडवलदारांच्या हातात गेल्यावर सर्वसामान्य जनतेसाठी ते अतिशय जाचक ठरेल. म्हणून आम्ही प्रस्तावित खाजगीकरणाचा कृती समितीच्या माध्यमातून कामावर परीणाम होऊ न देता काळ्या फिती लावून निषेध करीत आहोत. असे सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (SEA) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभि. श्री. पराग चौधरी यांनी सांगितले.

यावेळी सहसचिव अभि. कुंदन भंगाळे, सर्कल सचिव अभि. देवेंद्र भंगाळे, सर्कल अध्यक्ष अभि. संदीप महाजन, अभि. सुहास चौधरी, अभि. मिलिंद इंगळे, अभि. रत्ना पाटील, अभि. श्रुती सलामे, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे व्यवस्थापन सदस्य कॉ. जे. एन. बाविस्कर, केंद्रीय सल्लागार कॉ. पी. वाय. पाटील, कॉ. नाना पाटील, झोन सेक्रेटरी कॉ. विरेंद्र पाटील, कॉ. विजय सुर्यवंशी, कॉ. श्रीमती संध्या पाटील. आदींसह मोठ्या संख्येने अभियंते कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *