नागपूर (प्रतिनिधी)- कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे त्यात रिक्षांचे हप्ते भरणे अवघड जात आहे . त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांना महिन्याला 5 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी आणि ज्या ऑटोरिक्षा चालकांनी कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळं आत्महत्या केली त्या ऑटो रिक्षा चालकांच्या परिवाराला सरकारने 10 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी या मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूच्या संविधान चौकात आंदोलन केलं.
कोरोनामूळे ऑटो रिक्षा चालकांवर उपसमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात अनेक जणांनी आर्थिक अडचणीमुळं आत्महत्या केली आहे त्यामुळं सरकारनं ऑटो रिक्षा चालकांच्या समस्या सोडिण्यासाठी मदत करण्याची गरज असल्याच्या भावना ऑटो चालकांनी यावेळी व्यक्त केली.