जिद्द व कठीण मेहनतीच्या जीवावर खेड्यागावातील तरुण बनला कलेक्टर

जळगाव बातमी ऑनलाइन भुसावळ

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील तपतकठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला तरुण  कठीण मेहनतीच्या जीवावर कलेक्टर बनला असून मेहनतीला फळ असते हे त्याने सिद्ध केले आहे.   तालुक्यातील तपतकठोरा हे गाव वरणगाव पासून जवळच असून तेराशे लोकसंख्या असलेल्या गावातील कांतीलाल सुभाष पाटील हा तरुण आज कलेक्टर बनला असून ५ व्या प्रयात्नांत तो पास झाला आहे. माझ्या कठीण परिश्रमाने मला हे फळ मिळाले आहे. यासाठी मी ८ ते ९  तास अभ्यास केला असून इंटरनेटचा जास्त सदुपयोग करून घेतला.  कारण इंटरनेटवर आज भरपूर माहिती उपलब्ध आहे. इंटरनेट हे ज्ञानाचा अथांग सागर असून प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायला हवा.

कांतीलाल सुभाष पाटील  याचे प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजेच तपत कठोर येथे तर बारावी पर्यंत चे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथे झाले आहे. पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण हे नाशिक येथील के के ऑफ कॉलेज ऑफ  इंजिनीअरिंग येथे पूर्ण झाले व नंतर २०१५ पासून पुणे येथुन तयारी सुरु केली. अभ्यास करत असतांना इंटरनेटचा पुरेपूर वापर करून टेलीग्राम या समाज माध्यमाचा प्रभावी वापर केला मात्र इतर कोणत्याही सोशल मिडीयाचा वापर केला नाही. असेहि कांतीलाल सांगतो. कलेक्टर हे पद प्रभावी असल्यामुळे कलेक्टर झाल्यानतर समाजासाठी काम करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *