हर्षल सोनार
मुंदाणे (प्रतिनिधी) — फार्मसी स्टुडंट कौन्सिलच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी वेदांत शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी सौरभ पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच शुभम पाटील सचिवपदी नियुक्तीक करण्यात आली आहे. ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी स्टुडंट कॉन्सिलच्या जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली.
या निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष वेदांत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, फार्मसीच्या विद्याथ्र्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे तालुका तसेच जिल्हाभरातून कौतुक होत आहे.