राममंदिर हा शिवसेनेचा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय असून शिवसेना राममंदिरच्या विषयावर राजकारण करणार नाही – एकनाथ शिंदे

नागपुर बातमी ऑनलाइन

नागपूर (प्रतिनिधी)- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्त्याची मोठी समस्या आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत गर्भवती महिलांना पायपीट करत, रुग्णालयात जावं लागलं, ‘या सर्व परिस्थतीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार, आणि गडचिरोलीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार’ असं गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील आढावा घेण्यासाठी गडचिरोली ला रवाना झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘राममंदिर हा शिवसेनेचा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय असून शिवसेना राममंदिरच्या विषयावर राजकारण करणार नाही’ असंही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असून, सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *