राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे

बातमी ऑनलाइन मुंबई

नवनाथ चव्हाण

 मुंबई (प्रतिनिधी )- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडच्या सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहण यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी पारनेरच्या जितेश सरडे यांची नियुक्ती नक्की मानली जात होती. मात्र निष्ठावंत नाराज होतील यामुळे शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मागं पडल्याचं कळत आहे. त्याऐवजी पिंपरी-चिंचवडच्या सुनील गव्हाणे यांच्या नावाला पसंती देण्यात आली.
विभागवार प्रमुख म्हणून नियुक्त्या-

पुणे विभाग – संध्या उद्धव सोनावणे

कोकण विभाग – किरण गोरखनाथ शिखरे

मराठवाडा विभाग – प्रशांत कैलाश कदम

अमरावती विभाग – अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण

नाशिक विभाग – चिन्मय अविनाश गाढे

नागपुर विभाग – आशिष प्रकाश आवळे

आयटी विभाग – जितेश सुरेश सरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *