वंदूर येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधीत, स्थानिक प्रशासन सतर्क.

कोल्हापूर बातमी ऑनलाइन

प्रा.सुरेश डोणे

कोल्हापूर ( प्रतिनिधी )-  कागल तालुक्यातील वंदूर येथे पासष्ठ वर्षीय वृध्द महिलेचा काेराेना रिपाेर्ट पाँझीटिव्ह आला.तात्काळ गाव बंद करण्यात आले.ग्रमपंचायत कडून फवारणी करून गाव निर्जंतूकीकरण केले जात आहे.आराेग्य विभागाकडून घर टू घर सर्व्हे केली जात आहे.संपर्कातील आठ जणाना काेराेंटाइन केले असून गाव अहवालच्या प्रतिक्षेत आहे.
वंदूर येथील दलीत वस्ती मध्ये ६५ वर्षाच्या महिलेस काेराेना संसर्ग झालेने गावात एकच खळबळ उडाली. येथील ग्राम पंचायतीने व आराेग्य विभागाने सदरचा परीसर तात्काळ सिल केला.ट्रँक्टरच्या सहाय्याने संपूर्ण गावात फवारणी करून निर्जंतूरीकरण करण्याचे काम सुरू केले.

काेराेना ग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना संस्था काेरंटाईन करण्यात आले आहे.त्या सर्वांचे स्वँब घेण्यात आले आहे.संपूर्ण गाव त्यांचा अहवाल येण्याच्या प्रतिक्षेत आहे.
गावातील संपूर्ण दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे आहेत.गावातील रस्ते शुकशुकाट आहेत.वंदूर आराेग्य उपकेंद्राचे आराेग्य सेवक एन् .एस्. शेवाळे यांचे सह आराेग्य सेविका एस् .अे. मुल्ला,आशा वर्कर आनीता मगदुम ,नंदा पाटील,अर्चना कांबळे यांचे पथक घर टू घर फिरून माहीती घेत आहेत. संपुर्ण गावात रस्ते निर्मनुष्य बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *