नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

जळगाव, (जिमाका) दि. 9 – कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याचा दुसरा सोमवार, दिनांक 14 सप्टेंबर, 2020 या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे […]

Continue Reading

फिट इंडिया मिशन अतंर्गत आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 10 – शारीरिक तंदुरुस्तीकरीता नियमित व्यायामाची आवश्यकता असते. याकरीता “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवु शकतात. आपण आपल्या परिसरात कुठेही धावणे, चालणे किंवा सायकल चालवून […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जळगाव, (जिमाका) दि. 9 – जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, यासाठी शासकीय कोरोना तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी. असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली […]

Continue Reading

एक देश, एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

जळगाव, (जिमाका दि. 9 – शासनाने ‘‘ One Nation – One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी सूचना दिल्या आहेत. यासाठी 12 सप्टेंबर रोजी ‘‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस ’’ साजरा करणेत येणार आहे. […]

Continue Reading

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

जळगाव, (जिमाका) दि. 9 – शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांच्या 110 व्या अ भा व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता सदर परीक्षा ही दि. 18 ते 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती आर. पी. पगारे, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती; सुप्रीम कोर्ट

मुंबई  (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मोठ्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]

Continue Reading

खरीप पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगांव, (जिमाका) दि. 7 – कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. 1 जुलै ते 10 ऑक्टोबर, 2020 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2020 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर […]

Continue Reading

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र ; दीड लाख संशयितांच्या चाचण्या पूर्ण, 23 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव, (जिमाका) दि. 8 – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 651 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत […]

Continue Reading